अमृत पराक्रम दिनानिमित्त राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा व्यापक प्रचार-प्रसार होऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत, या उद्देशाने अमृतच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री ओंकार पवार यांच्याशी समन्वय साधण्यात आला.
अमृत पराक्रम दिनानिमित्त राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा व्यापक प्रचार-प्रसार होऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत, या उद्देशाने अमृतच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद-नाशिक श्री ओंकार पवार यांच्याशी समन्वय साधण्यात आला.
याच अनुषंगाने यांची अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. संजय गोसावी आणि अमृत मित्र यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी अमृत पराक्रम दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांची त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. त्याबाबतचे निवेदन त्यांना सुपूर्द करण्यात आले.
त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्यापर्यंत स्पर्धांची माहिती पोहोचविण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिले.
अमृत पराक्रम दिनानिमित्त आयोजित स्पर्धांची माहिती जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा, महाविद्यालये व गटशिक्षणाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक पत्र त्वरित निर्गमित करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी श्री. पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शौर्य, देशभक्ती व कर्तव्यभावना वृद्धिंगत करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरतील, असेही नमूद केले.
या भेटीद्वारे पराक्रम दिनानिमित्त आयोजित स्पर्धांचा जिल्हाभर प्रभावी प्रचार-प्रसार होऊन मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अधिक माहिती संपर्क-
अमृत कार्यलय नाशिक
संपर्क क्रमांक:9112228770/8857073911/8830046256
पत्ता: फ्लॅट नं 1 सदानंद बिल्डिंगस्वप्निल पार्क टिळक वाडी नाशिक.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment