छत्रपती संभाजीनगर येथील अमृत कार्यालयात महिला लाभार्थींची बैठक घेण्यात आली. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त आयोजित ‘अमृत पराक्रम दिन’ स्पर्धांची माहिती, नियम व सहभाग प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथील अमृत कार्यालयात महिला लाभार्थींची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत १८ ऑगस्ट रोजी अमृत संस्थेतर्फे साजरी करण्यात येणाऱ्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती आणि त्यानिमित्त अमृत संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृत पराक्रम दिन’ स्पर्धांची माहिती देण्यात आली.
बैठकीदरम्यान महिलांना व विद्यार्थ्यांना अमृत पराक्रम दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. स्पर्धांचे स्वरूप, सहभागाची प्रक्रिया तसेच नियम व अटी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थित महिला लाभार्थींशी संवाद साधून त्यांच्या व्यवसायामध्ये येणाऱ्या विविध अडचणी जाणून घेण्यात आल्या. त्या समस्यांवर उपाययोजना, व्यवसाय वृद्धीच्या संधी, तसेच अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ कसा घ्यावा? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अशा मार्गदर्शनपर बैठकीमुळे महिलांना व्यवसाय विकासासाठी नवी दिशा मिळत असून, अमृत संस्थेचे सामाजिक व उद्योजकता विकासाचे कार्य अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७५
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment