अमृत EDP प्रशिक्षणाचा चौल (तालुका-अलिबाग) येथे उत्साहात शुभारंभ!

अमृत उद्योग कौशल्यवर्धन (Entrepreneurship Development Program - EDP) या दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला.

अमृत EDP प्रशिक्षणाचा चौल (तालुका-अलिबाग) येथे उत्साहात शुभारंभ! मुख्य फोटो
अमृत EDP प्रशिक्षणाचा चौल (तालुका-अलिबाग) येथे उत्साहात शुभारंभ! अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्री सुंदरणारायन मंदिर , चौल,तालुका अलिबाग येथे दिनक ४ ऑगस्ट २०२६ रोजी 'अमृत उद्योग कौशल्यवर्धन' (Entrepreneurship Development Program - EDP) या दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला.

या प्रशिक्षणामध्ये पहिले ४ दिवस प्रत्यक्ष (ऑफलाईन) प्रशिक्षण तर पुढील ६ दिवस ऑनलाईन व्हिडिओ सत्रांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या दहा दिवसीय प्रशिक्षणातून नवीन उद्योग कसा सुरू करावा? अस्तित्वातील उद्योगाचा विस्तार (Scale-up) कसा करावा? आर्थिक नियोजन, बँक कर्ज प्रक्रिया, व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे.

उद्घाटन प्रसंगी श्री.शैलेन्द्र वासनिक ( शाखा व्यवस्थापक -भारतीय स्टेट बँक,चौल ), श्री.विश्वास जोशी (उद्योजक), श्री. शैलेश मराठे (जिल्हा व्यवस्थापक,रायगड- अलिबाग ) हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मान्यवर श्री शैलेन्द्र सर यांनी बँकिंग विषयी संपूर्ण माहिती, यामध्ये सीबील चे महत्व,प्रोजेक्ट रीपोर्ट कसा असावा? कर्ज कागदपत्रे बँक कर्ज केव्हा देते केव्हा नाकारते?बँकेचे नियम काय असतात ? कर्जाची परतफेड कशी करावी? आदि उद्योजकतेच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. तसेच स्टेट बँक चे श्री ललित म्हात्रे सर यांनी उद्यम आधार व बँक लोन चा अर्ज कसा भरावा? याबाबत मार्गदर्शन केले.

चौल येथील यशस्वी उद्योजक श्री विश्वास जोशी यांनी व्यवसायाची सुरवात कशी केली? आर्थिक नियोजन कसे केल? सुरुवातीचे भांडवल कसे उभे केले?कामगार नियोजन, व्यवसायातील महत्वाचे टप्पे,अडचणी, त्याचे निवारण कसे केले? आदि विषयावर चर्चा केली. तसेच महिला नव उद्योजिकांना जिद्द आणि शिकण्याची तयारी नेहमी अंगी बाळगा असा संदेशही दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शैलेश मराठे यांनी केले, तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन अमृत सखी जान्हवी साठे, सौ.रमा बापट व सौ. सुषमा आचार्य यांनी केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील चौल येथील नवउद्योजक महिला प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७५९


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 05-08-2026 News publication date | Time: 03:48 PM News publication time | Views: 103 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 05-08-2026 News publication date | Time: 03:48 PM News publication time | Views: 103 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

N
Nandini kiran Bhave
05-08-2026 08:35 PM

अमृतच काम खूप छान चालू आहे. अमृतपेठेमुळे मला हे काम जवळून अनुभवायला मिळाले. कार्यकर्त्यांची समाजापर्यंत विषय पोहचवण्याची धडपड, त्यासाठी घेतले जाणारे वेगवेगळे उपक्रम अनुभवले. सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा 🌹

Write a Comment
0 / 50 words
Advertisement