अमृत कार्यालय, नाशिक येथे पद्मश्री मा. रमेश रघुनाथ पतंगे यांनी सदिच्छा भेट दिली . यावेळी त्यांनी कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेत विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेतली.
पद्मश्री मा. रमेश पतंगे यांनी अमृत नाशिक कार्यालयास नुकतीच भेट दिली. मा. रमेशजी पतंगे हे समान नागरी कायदा महाराष्ट्र राज्य समिती सदस्य, सेन्सॉर बोर्ड सदस्य, अध्यक्ष, हिंदुस्थान प्रकाशन संस्था अशा अनेक सन्माननीय पदांवर कार्यरत आहेत. याशिवाय ते उत्तम लेखक आणि वक्ते आहेत. भारतीय संविधानावर त्यांचा सखोल अभ्यास आहे.
त्यांच्या नाशिक अमृत कार्यालय भेटीप्रसंगी त्यांनी अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती घेतली. दिनांक १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत चालू असलेल्या अमृत पराक्रम दिन या महत्वाकांक्षी स्पर्धांचे नियोजनही जाणून घेतले. एकंदरीतच त्यांनी या साऱ्याविषयी समाधान व्यक्त केले. अमृत च्या सर्वच योजना अतिशय लोकोपयोगी असून त्याचे कार्यवहन अतिशय पारदर्शक पद्धतीने व योग्य दिशेने केले जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या सर्व उपक्रमात माध्यम सहकार्य म्हणून साप्ताहिक विवेकचा उपयोग करून घेता येईल.असे आश्वासनही त्यांनी दिले.
त्यांच्या या भेटीप्रसंगी अमृत कोकण विभागीय व्यवस्थापक श्री. मंगेश खाडीलकर तसेच श्री.संजय गोसावी ,मयूर हातवळणे, अमृत सखी किर्ती शेटे उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment