अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ घेत छत्रपती संभाजीनगर येथील आदित्य टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक अनिकेत अशोक छापेकर यांना ₹३० हजारांचा व्याज परतावा मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनगरचे अनिकेत अशोक छापेकर हे आदित्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावाने व्यवसाय करतात. त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना अजून एक टुरिस्ट गाडी घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी जनता सहकारी बँकेकडून व्यवसाय कर्ज घेण्याचा निर्णय घेतला.
कर्ज काढण्यापूर्वी त्यांनी अमृतच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयाला भेट दिली. यावेळी अमृतकडून व्यवसायासाठी कोणकोणत्या योजना आहेत? याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यामध्ये वैयक्तिक व्याज परतावा योजना त्यांना समजावून सांगण्यात आली. व्याज परतावा लेटर काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? अर्ज कसा भरायचा आणि पुढची प्रक्रिया कशी असते? याबाबतही जिल्हा टीमने त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर अमृतकडून त्यांना व्याज परतावा लेटर देण्यात आले. त्यानंतर त्यांनी जनता सहकारी बँकेकडून व्यवसाय कर्ज मंजूर करून घेतले आणि नवीन टुरिस्ट गाडी खरेदी केली. कर्जाचे हप्ते त्यांनी वेळेवर भरले. त्यानंतर अमृतच्या व्याज परतावा योजनेतून तीन महिन्यांचे एकूण ₹३० हजार व्याज थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाले.
व्याज परतावा मिळाल्यानंतर अनिकेत छापेकर यांनी अमृतच्या विभागीय आणि जिल्हा कार्यालयाला भेट देऊन संपूर्ण टीमचे आभार मानले. "अमृतच्या मार्गदर्शनामुळे मला या योजनेचा फायदा झाला. खुल्या गटातील व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी ही योजना खूप उपयोगाची आहे. जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा," असे त्यांनी सांगितले.
यावेळी अमृतच्या जिल्हा टीमने त्यांचे स्वागत केले. व्यवसाय सुरू करायचा असो किंवा व्यवसाय वाढवायचा असो, अमृतची व्याज परतावा योजना खुल्या गटातील उद्योजकांसाठी मोठा आधार ठरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त व्यवसायिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
अधिक माहितीसाठी संपर्क : - 7391065475 / 9403200606 छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर - ४३१००९ अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment