अमृतच्या वतीने यवतमाळ शहरात लक्षित गटातील नागरिकांसाठी शासकीय दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर वंशिका अपार्टमेंट, माइंदे चौक, यवतमाळ येथे पार पडले.
अमृतच्या वतीने यवतमाळ शहरात लक्षित गटातील नागरिकांसाठी शासकीय दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर वंशिका अपार्टमेंट, माइंदे चौक, यवतमाळ येथे पार पडले. या शिबिरामध्ये लक्षित गटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र आदी शासकीय दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली व अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मदत करण्यात आली. यावेळी अमृत सखी भार्गवी लाखे यांनी उपस्थित लक्षित गटातील नागरिकांना अमृतच्या विविध योजना व उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवावा, असे आवाहन केले. अशा शिबिरांमुळे नागरिकांना शासकीय दाखले मिळविण्याची प्रक्रिया सुलभ होत असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध होण्यास मदत होते. भविष्यातही अमृतच्या वतीने अशा जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा , जिल्हा व्यवस्थापक , ९११२२२७६३३ जिल्हा कार्यालय पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए-१, अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment