छत्रपती संभाजीनगर येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार वाघमारे सर यांची अमृतच्या प्रतिनिधींनी घेतली भेट

छत्रपती संभाजीनगर येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार वाघमारे सर यांची अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी भेट घेतली.

छत्रपती संभाजीनगर येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार वाघमारे सर यांची अमृतच्या प्रतिनिधींनी घेतली भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती संभाजीनगर येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार वाघमारे सर यांची अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी भेट घेतली. यावेळी अमृतमार्फत सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती त्यांना देण्यात आली.

अमृतच्या माध्यमातून युवक, विद्यार्थी आणि गरजू नागरिकांसाठी कौशल्य विकास, उद्योजकता, प्रशिक्षण आणि इतर अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा, यासाठी अमृत करत असलेल्या कामाची माहिती वाघमारे यांना सांगण्यात आली.

यावेळी १८ ऑगस्ट रोजी थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त राज्यभर होणाऱ्या 'पराक्रम दिन' उपक्रमाबाबतही चर्चा झाली. शाळा, महाविद्यालये आणि युवकांच्या सहभागातून हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

तसेच 'अमृत शासन युवा संवाद' या उपक्रमाचीही माहिती देण्यात आली. शासन आणि युवक यांच्यामध्ये थेट संवाद आणि समन्वय निर्माण व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शासकीय कार्यालयांना भेट देण्याची संधी मिळते. त्या कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी नेमकं कसं काम करतात, नागरिकांची कामं कशी मार्गी लावली जातात, तसेच प्रत्येक शासकीय विभागाची भूमिका आणि काम करण्याची पद्धत काय असते, याची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शासकीय यंत्रणेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होतो आणि शासनाच्या कामकाजाची जवळून ओळख त्यांना होते.

या उपक्रमासाठी १२ ऑगस्टनंतर तारीख निश्चित करण्यात येईल, असे नायब तहसीलदार वाघमारे सर यांनी सांगितले. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 05-08-2026 News publication date | Time: 12:26 PM News publication time | Views: 45 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 05-08-2026 News publication date | Time: 12:26 PM News publication time | Views: 45 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement