छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भवन शाळेत 'पराक्रम दिन' उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक झाली चर्चा

१८ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या 'पराक्रम दिन' उपक्रमाबाबत अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी सरस्वती भवन शाळेचे मुख्याध्यापक विश्वरूप देविदास निकुंभ व उपमुख्याध्यापक गिरीश देशमुख यांची भेट घेऊन माहिती दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भवन शाळेत 'पराक्रम दिन' उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक झाली चर्चा मुख्य फोटो
छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भवन शाळेत 'पराक्रम दिन' उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक झाली चर्चा अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर:- छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भवन शाळेचे मुख्याध्यापक विश्वरूप देविदास निकुंभ आणि उपमुख्याध्यापक गिरीश देशमुख यांची अमृतच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. यावेळी १८ ऑगस्ट रोजी थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा 'पराक्रम दिन' शाळेत उत्साहात साजरा करण्यात यावा, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी 'पराक्रम दिन' उपक्रमाची माहिती देत त्यामागचा उद्देश आणि विद्यार्थ्यांसाठी असलेले महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर मुख्याध्यापक निकुंभ यांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत शाळेची संपूर्ण टीम हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करेल, असे सांगितले.


याच भेटीत शाळेत अमृतचे वर्ग सुरू करण्याबाबतही चर्चा झाली. त्यालाही शाळेच्या प्रशासनाने संमती दर्शवली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अमृतच्या विविध उपक्रमांचा लाभ मिळणार असून, शाळा आणि अमृत यांच्या माध्यमातून भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येतील.


अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७५

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 05-08-2026 News publication date | Time: 12:11 PM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 05-08-2026 News publication date | Time: 12:11 PM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement