'गुरुकृपा एजन्सी'च्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट क्षेत्रात मोठी भरारी! वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ घेत सुरू केला स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय; अनेक वाहनांच्या ताफ्यासह व्यवसायाचा यशस्वी विस्तार!
सोलापूरमधील ‘अमृत’च्या पाठबळावर सोनल मंत्री यांची यशस्वी उद्योजकता; 'गुरुकृपा एजन्सी'च्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट क्षेत्रात मोठी भरारी!
वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ घेत सुरू केला स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय; अनेक वाहनांच्या ताफ्यासह व्यवसायाचा यशस्वी विस्तार!
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत - AMRUT) संस्थेच्या योजनांमुळे राज्यातील अनेक तरुण-तरुणींना आणि नवउद्योजकांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे. याच योजनेचा सकारात्मक आणि प्रेरणादायी परिणाम सोलापूरच्या उद्योजिका सोनल मंत्री यांच्या यशोगाथेतून समोर आला आहे. ‘अमृत’ संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ घेऊन सोनल मंत्री यांनी 'गुरुकृपा एजन्सी' या नावाने स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू केला असून आज त्यांचा हा व्यवसाय अत्यंत यशस्वीरीत्या सुरू आहे.
योजना ठरली वरदान,
व्यवसायाला मिळाली गती
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आणि जिद्द असलेल्या सोनल मंत्री यांनी ‘अमृत’ प्रबोधिनीच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेची माहिती घेऊन त्याअंतर्गत आर्थिक सहाय्य व व्याज परतावा योजनेचा लाभ घेतला. या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या भक्कम आर्थिक पाठबळामुळे त्यांनी 'गुरुकृपा एजन्सी'ची स्थापना केली आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रात पाऊल ठेवले.
योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि उत्तम सेवेच्या जोरावर 'गुरुकृपा एजन्सी'ने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला एका वाहनातून सुरू झालेला हा प्रवास आज २ ते ३ व्यावसायिक वाहनांच्या (मालवाहू गाड्यांच्या) ताफ्यापर्यंत पोहोचला आहे. आज त्यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय अत्यंत उत्तम आणि फायदेशीर रीतीने सुरू आहे.
महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण
सोनल मंत्री यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता, समाजातील इतर महिलांसाठी आणि नवउद्योजकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. शासकीय व 'अमृत'सारख्या संस्थांच्या योजनांचा योग्य वापर केला, तर महिलादेखील पुरुषांच्या वरचढ समजल्या जाणाऱ्या ट्रान्सपोर्टसारख्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतात, हे सोनल मंत्री यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
'अमृत' संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेमुळे मला माझ्या स्वप्नांना पंख देता आले. 'गुरुकृपा एजन्सी'च्या माध्यमातून स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय उभा करताना 'अमृत' संस्थेचे सहकार्य मोलाचे ठरले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७६८
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment