स्थानिक उत्पादनांची होणार थेट विक्री
बुलढाणा : अमृत यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतपेठ या विशेष उपक्रमाचे आयोजन श्री संत गजानन महाराजांच्या पावन नगरी शेगाव येथे दि. ७ व ८ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे. अग्रसेन भवन, रेल्वे स्टेशनजवळ, शेगाव येथे सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत ही बाजारपेठ नागरिकांसाठी खुली राहणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील तालुका स्तरावर श्री संत गजानन महाराज शेगाव नगरी येथे ७ व ८ ऑगस्टला ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’; स्थानिक उद्योजकांना मिळणार थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी
अमृतच्या पुढाकारातून अग्रसेन भवन येथे विशेष बाजारपेठ; स्वदेशी व स्थानिक उत्पादनांची होणार थेट विक्री
बुलढाणा : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतपेठ या विशेष उपक्रमाचे आयोजन श्री संत गजानन महाराजांच्या पावन नगरी शेगाव येथे दि. ७ व ८ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे. अग्रसेन भवन, रेल्वे स्टेशनजवळ, शेगाव येथे सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत ही बाजारपेठ नागरिकांसाठी खुली राहणार आहे.
अमृतपेठ हा स्थानिक उद्योजक, महिला बचत गट, स्टार्टअप, कारागीर तसेच विविध स्वदेशी उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणारे प्रभावी व्यासपीठ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून उद्योजकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन, थेट विक्री, ब्रँडिंग व विपणनाची संधी मिळणार असून ग्राहकांना उत्पादकांकडूनच दर्जेदार व नाविन्यपूर्ण उत्पादने खरेदी करता येणार आहेत.
शेगाव शहर व परिसरातील नागरिकांसाठी स्थानिक उत्पादनांचा खजिना, स्वदेशी वस्तू, महिला उद्योजकांची उत्पादने, विविध हस्तकला व अनोख्या वस्तू एकाच छताखाली पाहण्याची व खरेदी करण्याची संधी या अमृतपेठेत उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, ग्राहक आणि उद्योजक यांच्यात थेट संवाद घडवून आणत ‘उत्पादक ते ग्राहक’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमातून स्थानिक उद्योजकतेला चालना, महिला बचत गटांना बाजारपेठ, नवउद्योजकांना व्यासपीठ आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा अमृतचा प्रयत्न आहे. प्रत्येक स्टॉलवर गुणवत्ता, विश्वास आणि वेगळेपणाला प्राधान्य देण्यात आले असून नागरिकांसाठी दर एक तासाला आकर्षक लकी ड्रॉ देखील आयोजित करण्यात येणार आहे.
शेगाव व परिसरातील नागरिकांनी कुटुंबासह अमृतपेठ थेट बाजारपेठेला भेट देऊन स्थानिक व स्वदेशी उत्पादनांची खरेदी करावी आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे.
अमृतपेठ – शेगाव दिनांक : ७ व ८ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी १० ते रात्री ९\
स्थळ : अग्रसेन भवन, रेल्वे स्टेशनजवळ, शेगाव
अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय, ३०५, तिसरा मजला, बुलढाणा प्राईड बिल्डिंग, बुलढाणा. संपर्क : 9112227637/8308998922
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment