अमृत महाराष्ट्र शासन स्वायत्त संस्थेच्या वतीने आर्णी तालुक्यात ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांचे कार्य, विविध सेवा आणि प्रशासकीय प्रक्रिया प्रत्यक्ष समजावून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आर्णी, दि. ४ ऑगस्ट : अमृत महाराष्ट्र शासन स्वायत्त संस्थेच्या वतीने आर्णी तालुक्यात ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांचे कार्य, विविध सेवा आणि प्रशासकीय प्रक्रिया प्रत्यक्ष समजावून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालय, आर्णी येथील विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली. यावेळी नायब तहसीलदार श्री. संतोष आदमुलवाड यांनी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाचे दैनंदिन कामकाज, महसूल विभागाची कार्यपद्धती, उत्पन्न, जात, रहिवासी, नॉन-क्रीमीलेयर इत्यादी विविध दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे, तसेच नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय सेवांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून प्रशासनाच्या कार्यपद्धतीची सखोल माहिती जाणून घेतली.
या उपक्रमासाठी तहसीलदार श्री. वैशाख वाहूरवाघ यांनी सहकार्य व परवानगी दिल्याबद्दल अमृतच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. परीक्षित शर्मा,आणि उपव्यवस्थापक श्री. कामेश राखे, तसेच स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालय, आर्णी येथील श्री. सुरेश काळे सर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजना, प्रशासनाशी संवादाचे महत्त्व आणि नागरिक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
‘अमृत संवाद सेतू’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रशासनाशी प्रत्यक्ष जोडणारा आणि शासकीय योजनांविषयी जागरूकता निर्माण करणारा प्रभावी उपक्रम ठरत असून, भविष्यातही जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अमृतच्या वतीने सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा - जिल्हा व्यवस्थापक फोन- ९११२२२७६३३
जिल्हा कार्यालय पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए-१, अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment