मैत्री दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथून आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय भंडारदरा निसर्गभ्रमंती सहल उत्साहात संपन्न झाली. या सहलीचे आयोजन अमृत सखी सौ. मंजू कुलकर्णी यांनी केले असून बाबा अमरनाथ ट्रॅव्हल्स यांचे सहकार्य लाभले.
छत्रपती संभाजीनगर, दि. २ ऑगस्ट २०२६ : मैत्री दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर अमृत पर्यटन च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली भंडारदरा निसर्गभ्रमंती दोन दिवसीय सहल उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सहलीचे आयोजन अमृत सखी सौ. मंजू कुलकर्णी यांनी केले असून, बाबा अमरनाथ ट्रॅव्हल्स यांचे सहकार्य लाभले. सहलीदरम्यान पर्यटकांनी हरिश्चंद्रगड ट्रेक, हरिश्चंद्रेश्वर मंदिर दर्शन, केदारेश्वर गुहा, वसुंधरा वॉटरफॉल, न्हाणी वॉटरफॉल, बाहुबली वॉटरफॉल, रंधा धबधबा तसेच भंडारदरा धरण या प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट दिली. हिरवाईने नटलेले डोंगर, धबधब्यांचा मनमोहक नजारा आणि निसर्गरम्य वातावरणामुळे सर्व सहभागी भारावून गेले. संपूर्ण सहलीत पर्यटकांनी ट्रेकिंगचा रोमांच, धार्मिक स्थळांचे दर्शन आणि निसर्गाच्या सान्निध्यातील आनंद अनुभवला. प्रत्येक ठिकाणी छायाचित्रे काढत आणि मैत्रीचे सुंदर क्षण साजरे करत सहभागी महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या निसर्गभ्रमंतीमुळे सहभागी पर्यटकांना दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा मिळाला. सहलीतील प्रत्येक क्षण आनंददायी व संस्मरणीय ठरला असून, सर्वांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
अमृत सखी सौ. मंजू कुलकर्णी यांच्या नियोजनामुळे आणि बाबा अमरनाथ ट्रॅव्हल्स यांच्या सहकार्यामुळे ही मैत्री दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली भंडारदरा निसर्गभ्रमंती सहल यशस्वीरीत्या पार पडली. सहभागी पर्यटकांनी हा अनुभव अविस्मरणीय असल्याची भावना व्यक्त करत अशा आणखी सहलींचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment