शिरूर(जि.पुणे) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना 'अमृत' योजनेअंतर्गत ड्रोन व तांत्रिक प्रशिक्षणाची दिली माहिती

शिरू:येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल (MCVC) मध्ये इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष मार्गदर्शकपर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांना तांत्रिक क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी आणि शासकीय प्रशिक्षण योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

शिरूर(जि.पुणे) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना 'अमृत' योजनेअंतर्गत ड्रोन व तांत्रिक प्रशिक्षणाची दिली माहिती मुख्य फोटो
शिरूर(जि.पुणे) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना 'अमृत' योजनेअंतर्गत ड्रोन व तांत्रिक प्रशिक्षणाची दिली माहिती अतिरिक्त फोटो

शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना 'अमृत' योजनेअंतर्गत ड्रोन व तांत्रिक प्रशिक्षणाची माहिती; लाभ घेण्याचे आवाहन

येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल (MCVC) मध्ये इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष मार्गदर्शकपर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांना तांत्रिक क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी आणि शासकीय प्रशिक्षण योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

या प्रसंगी उपस्थित प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना IGTR (इंडो जर्मन टूल रूम) आणि NIELIT (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) अंतर्गत चालणाऱ्या विविध व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणांची माहिती दिली.

या योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य कसे विकसित करावे, याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.या संस्थेच्या विभाग प्रमुख सौ बनसोडे मॅडम आणि मुख्याध्यापक श्री मचाले सर यांची विशेष भेट घेण्यात आली.

त्यांना 'अमृत' (AMRUT) योजनेच्या संदर्भातील उद्दिष्टे आणि रूपरेषा समजावून सांगण्यात आली. यासोबतच, आधुनिक काळाची गरज लक्षात घेता ड्रोन प्रशिक्षण आणि GCC-TBC या महत्त्वपूर्ण योजनांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. कॉलेज प्रशासनाने या उपक्रमाचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 04-08-2026 News publication date | Time: 10:40 AM News publication time | Views: 51 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news
Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 04-08-2026 News publication date | Time: 10:40 AM News publication time | Views: 51 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement