शिक्षण अधिकारी (अमरावती) प्रिया देशमुख यांना ‘अमृत पराक्रम दिन’ स्पर्धांबाबत निवेदन सादर

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), अमरावती जिल्हा कार्यालयाच्या वतीने आज शिक्षण अधिकारी सौ. प्रिया देशमुख यांची भेट घेऊन ‘अमृत पराक्रम दिन’ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रील्स स्पर्धांबाबत अधिकृत पत्र (निवेदन) सादर करण्यात आले.

 शिक्षण अधिकारी (अमरावती) प्रिया देशमुख यांना ‘अमृत पराक्रम दिन’ स्पर्धांबाबत निवेदन सादर मुख्य फोटो
मुख्य फोटो

यावेळी ‘अमृत पराक्रम दिन’ उपक्रमाचा उद्देश, स्पर्धेचे विषय, वयोगट, नियमावली, प्रवेश प्रक्रिया, बक्षीस योजना तसेच दि. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणाऱ्या स्पर्धांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये या स्पर्धेचा व्यापक प्रचार-प्रसार करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी शिक्षण विभागामार्फत आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली. यंदा प्रथमच दि. १८ ऑगस्ट हा दिवस ‘अमृत पराक्रम दिन’ म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत असून, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, नेतृत्व, राष्ट्रनिष्ठा व युद्धनीतीची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची नोंदणी, विषय, नियमावली व इतर माहिती parakramdin.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन अमृत, अमरावती जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय, अमरावती आशीर्वाद बिल्डिंग, मालटेकडी रोड, गृह निर्माण भवनजवळ, टोपे नगर, मालटेकडी, अमरावती – ४४४६०२. संपर्क क्रमांक : ९११२२२७६३५

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Rushikesh Harish kathalkar News publisher name | Date: 03-08-2026 News publication date | Time: 04:55 PM News publication time | Views: 145 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: Rushikesh Harish kathalkar News publisher name | Date: 03-08-2026 News publication date | Time: 04:55 PM News publication time | Views: 145 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement