उदगीरमध्ये आर्यवैश्य समाजाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात अमृत योजनांची माहिती

आर्यवैश्य समाज, उदगीर यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात अमृतच्या विविध रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, उद्योजकता विकास तसेच शासकीय योजनांची उपस्थित विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांना सविस्तर माहिती देण्यात आली.

उदगीरमध्ये आर्यवैश्य समाजाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात अमृत योजनांची माहिती  मुख्य फोटो
उदगीरमध्ये आर्यवैश्य समाजाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात अमृत योजनांची माहिती  अतिरिक्त फोटो

आर्यवैश्य समाज, उदगीर यांच्या वतीने आयोजित *गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा* उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या विविध रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, उद्योजकता विकास तसेच शासकीय योजनांची उपस्थित विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांना सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री शुभम मुळजकर व अमृत मित्र श्री अमित पांडे यांनी अमृतच्या विविध योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया व उपलब्ध प्रशिक्षण कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांबाबत जाणून घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री किशोर पंदिलवार हे होते. AVOPA चे अध्यक्ष श्री विजायकुमार गबाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर मार्गदर्शक श्री बाळकृष्ण मुक्कावार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री सुनील बेजगमवार (माजी नगराध्यक्ष, कुंडलवाडी) आणि मा. श्री सूर्यकांत मुक्कावार (उद्योजक, उदगीर) यांची उपस्थिती लाभली. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास प्रा. डॉ. दीपक चिद्रवार (AVOPA संस्थापक अध्यक्ष), श्री बालाजी मुन्नावार, श्री गणेश मुक्कावार, श्री विकास पत्तेवार, श्री अनिल मारमवार, श्री राजेंद्र पेन्सलवार, AVOPA कार्यकारिणी सदस्य, आर्यवैश्य समाजाचे आजीवन सदस्य तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार नियोजन समिती, उदगीर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, समाजबांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

अधिक माहितीसाठी संपर्क: शुभम मुळजकर,जिल्हा व्यवस्थापक , अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर.तालुका, जिल्हा लातूर-413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: chintesh Joshi News publisher name | Date: 03-08-2026 News publication date | Time: 03:11 PM News publication time | Views: 150 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: chintesh Joshi News publisher name | Date: 03-08-2026 News publication date | Time: 03:11 PM News publication time | Views: 150 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement