ब्राह्मण व्यावसायिकांनी नेटवर्किंग आणि व्यवसायवृद्धीवर द्यावा भर

'अमृत'च्या यवतमाळ जिल्हा कार्यालयात 'बीबीएन'च्या पुढाकाराने झालेल्या बैठकीतील सूर

ब्राह्मण व्यावसायिकांनी नेटवर्किंग आणि व्यवसायवृद्धीवर द्यावा भर मुख्य फोटो
मुख्य फोटो

यवतमाळ : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या यवतमाळ जिल्हा कार्यालयात नुकतीच ब्राह्मण समाजातील प्रमुख व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ब्राह्मण बिझनेस नेटवर्कच्या (बीबीएन) यवतमाळ शाखेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला वीस व्यावसायिक उपस्थित होते.

या बैठकीत 'बीबीएन'चे श्रीपाद कुलकर्णी यांनी ब्राह्मण बिझनेस नेटवर्कच्या उद्दिष्टांबाबत, तसेच कार्यपद्धतीबाबत आणि व्यावसायिकांना मिळणाऱ्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली. व्यावसायिकांनी परस्पर सहकार्य, नेटवर्किंग आणि व्यवसायवृद्धीवर भर देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक परीक्षित शर्मा यांनी अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच त्या योजनांचा लाभ व्यावसायिक व समाजातील गरजू घटकांनी कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले.

या बैठकीत श्रीफळ इलेक्ट्रिकल एजन्सीचे अजय म्हैसाळकर, तसेच बीबीएन नेटवर्कच्या सौ. अपर्णा कंठे यांच्यासह किशोर पाठक, अजय चोपाने, अमर भाटवडेकर, प्रशांत परसोडकर आदी अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. या बैठकीमुळे ब्राह्मण समाजातील व्यावसायिकांमध्ये नेटवर्किंग वाढून, संवाद व सहकार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

अधिक माहितीसाठी संपर्क :
परीक्षित शर्मा 9112227633
यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
https://mahaamrut.org.in/

Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 27-12-2025 News publication date | Time: 05:46 PM News publication time | Views: 278 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 27-12-2025 News publication date | Time: 05:46 PM News publication time | Views: 278 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words