भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक, राष्ट्रजागृतीचे प्रणेते आणि "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" असा बुलंद नारा देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवा ब्राह्मण संघ व अमृत, यवतमाळ जिल्हा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यवतमाळ, दि. १ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक, राष्ट्रजागृतीचे प्रणेते आणि "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" असा बुलंद नारा देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवा ब्राह्मण संघ व अमृत, यवतमाळ जिल्हा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. वक्त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्माण, स्वातंत्र्यलढा, शिक्षण आणि समाजजागृतीतील अतुलनीय योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. तसेच युवकांनी त्यांच्या राष्ट्रभक्ती, नेतृत्व आणि चारित्र्याचा आदर्श स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. याच कार्यक्रमात अमृत यांच्या वतीने 'पराक्रम दिन' अर्थात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. स्पर्धांमध्ये विद्यार्थी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्यपूर्ण इतिहासाचा अभ्यास करावा तसेच राष्ट्रप्रेम आणि पराक्रमाची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास युवा ब्राह्मण संघाचे पदाधिकारी, अमृत यवतमाळ जिल्हा कार्यालयाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा प्रसार करण्याबरोबरच आगामी 'पराक्रम दिन' उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा जिल्हा व्यवस्थापक ९११२२२७६३३ जिल्हा कार्यालय पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए-१, अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment