विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने पोतदार अबॅकस अकॅडमी, माजलगाव येथे ‘अमृत वर्ग’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. अकॅडमीच्या संचालिका सौ. सुचिता पोतदार यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
माजलगाव, दि. १ ऑगस्ट : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने पोतदार अबॅकस अकॅडमी, माजलगाव येथे ‘अमृत वर्ग’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. अकॅडमीच्या संचालिका सौ. सुचिता पोतदार यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
यावेळी अमृतचे श्री. चिंतेश जोशी व श्री. सुमित धिरडे हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, वेळेचे नियोजन, सकारात्मक विचार, राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव तसेच आदर्श नागरिक घडण्यासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांविषयी मार्गदर्शन केले. शिक्षणासोबतच संस्कार, चारित्र्य आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
याप्रसंगी सौ. सुचिता पोतदार यांनी विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक नव्हे, तर वैचारिक, नैतिक व सामाजिक विकास घडविण्याच्या उद्देशाने पोतदार अबॅकस अकॅडमीत नियमितपणे ‘अमृत वर्ग’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468 पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय, अथर्व अभ्यासिकेच्या वर, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी बीड. 431122 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment