महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान अभियान’ अंतर्गत मंगरूळ येथे आयोजित कार्यक्रमात अमृतच्या वतीने माहिती व जनजागृतीपर स्टॉल उभारण्यात आला. या स्टॉलच्या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी, युवक तसेच विविध घटकांतील लाभार्थींना अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.
मंगरूळ :
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत मंगरूळ येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने माहिती व जनजागृतीपर स्टॉल उभारण्यात आला. या स्टॉलच्या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी, युवक तसेच विविध घटकांतील लाभार्थींना अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.
अमृत संस्थेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील पात्र लाभार्थी, विद्यार्थी, युवक व नागरिकांसाठी विविध शैक्षणिक, प्रशिक्षण, कौशल्य विकास व रोजगाराभिमुख योजना राबविण्यात येतात. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने अशा जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्यात येत आहे.
मंगरूळ येथील अभियानादरम्यान अमृतच्या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक नागरिकांनी अमृतच्या योजनांची माहिती जाणून घेतली तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया व उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन घेतले. त्यामुळे अमृतच्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत झाली.
‘शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत,’ या उद्देशाने अशा अभियानांच्या माध्यमातून जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. मंगरूळ येथे आयोजित या अभियानामुळे अमृतच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम उपलब्ध झाले असून, भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक पात्र लाभार्थींना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment