रत्नागिरी येथे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात 'अमृत'च्या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात' महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आकर्षक माहितीपर स्टॉल उभारण्यात आला.

रत्नागिरी येथे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात 'अमृत'च्या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य फोटो
रत्नागिरी येथे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात 'अमृत'च्या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अतिरिक्त फोटो

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात' महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आकर्षक माहितीपर स्टॉल उभारण्यात आला. जिल्हाभरातून आलेल्या हजारो नागरिकांनी या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अमृतच्या विविध योजना, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, उद्योजकता प्रशिक्षण, आर्थिक सक्षमीकरण तसेच युवक, महिला आणि उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या भव्य समाधान शिबिराला महाराष्ट्राचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डॉ. उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा मा. अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रमोद जठार, आमदार विक्रांत पाटील, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून पाच हजारांहून अधिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या मोठ्या जनसंपर्काच्या माध्यमातून अमृतच्या विविध योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार झाला. स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य विकास प्रशिक्षण, उद्योजकता विकास कार्यक्रम आणि शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांविषयी नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली. अनेक युवक, महिला, नवउद्योजक आणि इच्छुक लाभार्थींनी अमृतच्या अधिकाऱ्यांकडून योजनांची सविस्तर माहिती घेतली तसेच आगामी प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. अशा समाधान शिबिरात अमृतच्या सहभागामुळे संस्थेच्या उपक्रमांना व्यापक व्यासपीठ मिळाले असून, शासनाच्या लोककल्याणकारी योजनांसह अमृतच्या सेवा अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत परिणामकारक ठरला. "प्रशिक्षणातून प्रगती आणि उद्योजकतेतून आत्मनिर्भरता" हा अमृतचा संदेश जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात या शिबिराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Santosh Juvale News publisher name | Date: 03-08-2026 News publication date | Time: 07:00 AM News publication time | Views: 547 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Santosh Juvale News publisher name | Date: 03-08-2026 News publication date | Time: 07:00 AM News publication time | Views: 547 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement