कोपरगाव (अहिल्यानगर ) येथे दि.५ ऑगस्टपासून "उद्योजकता विकास कार्यक्रम" प्रशिक्षणास होणार सुरवात

अहिल्यानगर मधील कोपरगाव येथे अमृत संस्था अंतर्गत दिनांक ५ ऑगस्ट २०२६ पासून "उद्योजकता विकास कार्यक्रम" प्रशिक्षणास सुरवात होणार आहे.या प्रशिक्षणाचे उदघाटन जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे हे करणार आहेत.

कोपरगाव (अहिल्यानगर ) येथे  दि.५ ऑगस्टपासून "उद्योजकता विकास कार्यक्रम" प्रशिक्षणास होणार सुरवात  मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर मधील कोपरगाव येथे अमृत संस्था अंतर्गत दिनांक ५ ऑगस्ट २०२६ पासून "उद्योजकता विकास कार्यक्रम" प्रशिक्षणास सुरवात होणार आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे व रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देणे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. प्रशिक्षणामध्ये समाविष्ट पुढील विषय असणार आहेत :-

* अमृत पेठ – बाजारपेठ व ऑनलाइन प्लॅटफॉर्मची माहीती.

* जिल्हा उद्योग केंद्र व विविध शासकीय योजनांची माहिती(CMEGP)

* उद्योजकीय मानसिकता (आत्मविश्वास, संघटन कौशल्य, जोखीम स्वीकारण्याची क्षमता, उपक्रमशीलता)

* व्यवसायाची योग्य निवड

- व्यवसाय नियोजन - बँक अधिकारी यांचे मार्गदर्शन (कर्ज प्रक्रिया व कागदपत्रे)

- सेल्स स्किल, ब्रँडिंग, मार्केटिंग व नेटवर्किंग

हे प्रशिक्षण पुढील ठिकाणी होणार आहे- "सायबरनेट सिस्टिम कॉम्पुटर इन्स्टिट्यूट", छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी ,स्वास्तिक मेडिकल च्या वर ,कोपरगाव,अहिल्यानगर.

या प्रशिक्षणाचा कालावधी प्रशिक्षण कालावधी १० दिवसाचा असून यामध्ये - ४ दिवस ऑफलाइन ( दररोज २ तास ) तसेच- ६ दिवस ऑनलाइन व्हिडियो दिले जातील .

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व लभार्थी यांना शासकीय प्रमाणपत्र प्रदाण करण्यात येईल, जे विविध क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठरेल.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, सिंधी, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003


Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 02-08-2026 News publication date | Time: 05:57 PM News publication time | Views: 41 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 02-08-2026 News publication date | Time: 05:57 PM News publication time | Views: 41 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement