सटाणा येथे नुकतेच उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले.
सटाणा येथे उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन
सटाणा -येथे महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी च्या माध्यमातून उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन बागलाण ब्राम्हण सभा अध्यक्ष मा. वामनराव जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तालुका कार्यवाह गणेश वाघ, निवृत्त बँक अधिकारी दिलीप बोथरा यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता उत्कर्ष व्होकेशनल ट्रेंनिंग सेंटर येथे पार पडले.
यावेळी बोलताना वामनराव जोशी सांगितले की समाजातील तरुणांनी नौकरी च्या मागे न लागता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करावा व अमृतच्या विविध योजनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
आजच्या पहिल्या सत्रात निवृत्त बँक अधिकारी दिलीप बोथरा साहेबांनी बँक व बँकेच्या माध्यमातून योजना विषयी चर्चात्मक माहिती दिली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment