महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत समाधान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
मालेगाव, दि. १ ऑगस्ट : अमेय रिसॉर्ट, मालेगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत समाधान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. दादा भुसे यांच्या हस्ते झाले. शिबिरात शासनाच्या विविध विभागांचे एकूण ३४ माहिती स्टॉल उभारण्यात आले होते.महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात महाराजास्व अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरात महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या माहिती स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. दिपक गुप्ता व कर्मचारी अजिंक्य कन्नल यांनी नागरिकांना कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योजकता विकास, तसेच व्याज परतावा योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करून विविध शासकीय योजनांची माहिती दिली. नागरिकांपर्यंत योजनांची प्रभावी माहिती पोहोचवल्याबद्दल उपविभागीय अधिकारी मा. नितीन सदगीर व तहसीलदार विशाल सोनवणे यांनी अमृतच्या स्टॉलला भेट देऊन संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. यावेळी अमृत संस्थेमार्फत ड्रोन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना उपविभागीय अधिकारी मा. नितीन सदगीर व तहसीलदार विशाल सोनवणे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये कौशल्य विकास व स्वयंरोजगाराबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment