हिंगोली येथे 'अमृत उद्योग कौशल्यवर्धन' (EDP) दहा दिवसीय प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने हिंगोली येथे 'अमृत उद्योग कौशल्यवर्धन' (EDP) दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

हिंगोली येथे 'अमृत उद्योग कौशल्यवर्धन' (EDP) दहा दिवसीय प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ मुख्य फोटो
हिंगोली येथे 'अमृत उद्योग कौशल्यवर्धन' (EDP) दहा दिवसीय प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ अतिरिक्त फोटो

हिंगोली, दि. १ ऑगस्ट : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने रेनबो इन्स्टिट्यूट, हिंगोली येथे 'अमृत उद्योग कौशल्यवर्धन' (Entrepreneurship Development Program - EDP) या दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला.

या प्रशिक्षणामध्ये उद्योग उभारणी, व्यवसाय व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, बँक कर्ज प्रक्रिया, डिजिटल मार्केटिंग व विविध शासकीय योजनांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. उद्घाटनप्रसंगी विभागीय उपव्यवस्थापक श्री. ओमकार शेटे, जिल्हा व्यवस्थापक श्री. श्रीकांत धोतरे यांच्यासह प्रमुख प्रशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्यातील युवक-युवती, महिला आणि नवउद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रशिक्षणामध्ये पहिले चार दिवस प्रत्यक्ष (ऑफलाईन) प्रशिक्षण, तर पुढील सहा दिवस ऑनलाईन व्हिडिओ सत्रांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया, विद्यमान उद्योगाचा विस्तार, व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, बँक कर्ज प्रक्रिया, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती तज्ज्ञांकडून देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अमृतचे विभागीय उपव्यवस्थापक श्री. ओमकार शेटे, जिल्हा व्यवस्थापक श्री. श्रीकांत धोतरे, प्रमुख प्रशिक्षक DSM, LTC, DCO, CPFM, DMCJ, SHG धारक श्री. विजयकुमार कांबळे, तसेच श्री. हेमंत डोंगरे (MBA – Agri Business Management, German Language, KLiC Diploma in Cyber Security & Computer) आणि श्री. अंकुश देशमाने (MBA, KLiC Diploma in Computer Programming & Hardware) उपस्थित होते.

यावेळी प्रमुख प्रशिक्षक श्री. विजयकुमार कांबळे यांनी प्रशिक्षणाची रूपरेषा स्पष्ट करून उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याचे महत्त्व सांगितले. श्री. हेमंत डोंगरे आणि श्री. अंकुश देशमाने यांनीही आधुनिक उद्योग व्यवस्थापन, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवसायातील संधी याविषयी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा व्यवस्थापक श्री. श्रीकांत धोतरे यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री. विजयकुमार कांबळे यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्यातील नवउद्योजक, युवक-युवती, महिला आणि उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, या उपक्रमामुळे जिल्ह्यात उद्योजकतेला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 01-08-2026 News publication date | Time: 04:24 PM News publication time | Views: 77 Number of times this news has been viewed | District: Hingoli Related district of the news
Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 01-08-2026 News publication date | Time: 04:24 PM News publication time | Views: 77 Number of times this news has been viewed | District: Hingoli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement