लक्ष्मी अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री अशोक सेठ अग्रवाल यांची अमृतच्या प्रतिनिधींनी घेतली सदिच्छा भेट

लातूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष्मी अर्बन बँक, लातूरचे अध्यक्ष श्री अशोक सेठ अग्रवाल यांची सदिच्छा भेट घेतली.

लक्ष्मी अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री अशोक सेठ अग्रवाल यांची अमृतच्या प्रतिनिधींनी  घेतली सदिच्छा भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

लातूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने जिल्हा उपव्यवस्थापक श्री चिंतेश जोशी व अमृत मित्र श्री अमित पांडे यांनी लक्ष्मी अर्बन बँक, लातूरचे अध्यक्ष श्री अशोक सेठ अग्रवाल यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योजकता विकास तसेच युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. या भेटीदरम्यान अमृत संस्थेच्या 'अमृत पेठ' या उपक्रमावर विशेष चर्चा करण्यात आली. स्थानिक शेतकरी, महिला बचत गट, कारागीर तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना व्यापक व्यासपीठ मिळवून देणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. श्री अशोक सेठ अग्रवाल यांनी अमृतच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत संस्थेच्या विविध उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली. तसेच भविष्यात समाजोपयोगी व विकासाभिमुख उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परस्पर समन्वयातून कार्य करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. ही सदिच्छा भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी परस्पर सहकार्याने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: कमलाक्षी कुलकर्णी News publisher name | Date: 01-08-2026 News publication date | Time: 03:45 PM News publication time | Views: 105 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: कमलाक्षी कुलकर्णी News publisher name | Date: 01-08-2026 News publication date | Time: 03:45 PM News publication time | Views: 105 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement