हिंगोली जिल्ह्यात 'पराक्रम दिन' निमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांच्या प्रसारासाठी मा. शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांना अधिकृत पत्र व माहितीपत्रक सादर करण्यात आले. यावेळी शिक्षण विभागाने स्पर्धेची माहिती सर्व शाळांपर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
हिंगोली, : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'पराक्रम दिन' राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात मा. शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी स्पर्धांबाबतचे अधिकृत पत्र व माहितीपत्रक सादर करण्यात आले. भेटीदरम्यान स्पर्धांचे उद्दिष्ट, नियमावली, विविध गटांतील विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच दि. १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित स्पर्धांची सविस्तर माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये या स्पर्धेची माहिती प्रभावीपणे पोहोचावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, यासाठी शिक्षण विभागाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मा. शिक्षण अधिकारी यांनी उपक्रमास अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळांपर्यंत स्पर्धेची माहिती पोहोचविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमाला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल व सहकार्याबद्दल मा. शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांचे अमृत, हिंगोली जिल्ह्याच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment