नंदुरबार जिल्ह्यात महिलांना मिळणार आरी वर्कचे व्यावसायिक प्रशिक्षण
महिलांच्या स्वावलंबनासाठी अमृत या शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या पुढाकाराने आरी वर्क प्रशिक्षणाची सुरवात नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. आजच्या बदलत्या काळात महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी होणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या संस्थेअंतर्गत अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष व्यावसायिक प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत आरी वर्क या रोजगारक्षम व मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण विशेषतः खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी आयोजित करण्यात आले आहे. आरी वर्क ही कापडावर सुईसारख्या आरीने केली जाणारी नक्षीकामाची कला आहे. कपडे, दुपट्टे, साड्या, लेहेंगा, ब्लाउज, पडदे, उशांचे कव्हर इत्यादींसाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो तसेच घरातील सजावटीसाठी आकर्षक व कलात्मक डिझाइन तयार करण्याचे कौशल्य यामध्ये शिकवले जाणार प्रशिक्षणातून घरबसल्या व्यवसाय उभारण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे अनुभवी प्रशिक्षकांकडून थेट मार्गदर्शन, व्यावसायिक कौशल्ये मिळवण्याची संधी आणि प्रशिक्षणानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी. अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची, कुटुंबाला आर्थिक आधार देण्याची आणि आत्मविश्वासाने समाजात पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी, स्वावलंबनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत स्वायत्त संस्थेचे नंदुरबार जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांच्या वतीने करण्यात आले आहे... या वेळी अमृत मित्र दिनेश पाठक, माजी पोलीस पाटील आप्पा गिरासे व प्रशिक्षक दीपाली राजपूत यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन महिलांना केले अधिक माहितीसाठी नंदुरबार जिल्हा कार्यालय (अमृत ) 9112228771
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment