'पराक्रम दिन' राज्यस्तरीय स्पर्धांच्या प्रसार व जनजागृतीसाठी मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना निवेदन सादर

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'पराक्रम दिन' राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांच्या प्रसार, प्रसिद्धी व जनजागृतीसंदर्भात अमृत, कोल्हापूरचे जिल्हा व्यवस्थापक श्री. अभिजित कुलकर्णी यांनी मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर डॉ. विजय राठोड यांची सदिच्छा भेट घेऊन अधिकृत पत्र सादर केले.

'पराक्रम दिन' राज्यस्तरीय स्पर्धांच्या प्रसार व जनजागृतीसाठी मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना निवेदन सादर मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'पराक्रम दिन' राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांच्या प्रसार, प्रसिद्धी व जनजागृतीसंदर्भात अमृत, कोल्हापूरचे जिल्हा व्यवस्थापक श्री. अभिजित कुलकर्णी यांनी मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर डॉ. विजय राठोड यांची सदिच्छा भेट घेऊन अधिकृत पत्र सादर केले.

यावेळी मा. जिल्हाधिकारी यांना 'पराक्रम दिन' उपक्रमाची संकल्पना, स्पर्धांचे स्वरूप, उद्दिष्टे तसेच विद्यार्थी, युवक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान, राष्ट्रभावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या दृष्टीने या स्पर्धांचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

तसेच दि. १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ते सहकार्य व प्रसार करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली.

मा. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी या उपक्रमाचे स्वागत करत स्पर्धांच्या व्यापक प्रसिद्धीसाठी तसेच जिल्ह्यात अधिकाधिक सहभाग नोंदविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

या प्रसंगी 'पराक्रम दिन' उपक्रमाच्या माध्यमातून इतिहासातील प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या अमृतच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल अमृत, कोल्हापूर यांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

अधिक माहितीसाठी संपर्क - ९११२२२८७६४

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 01-08-2026 News publication date | Time: 10:56 AM News publication time | Views: 66 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement