सिल्लोडमध्ये महाराजस्व अभियानात ‘अमृत’च्या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

सिल्लोड येथील महाराजस्व अभियानात महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था अमृतच्या माहिती स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मा. आमदार अब्दुल सत्तार यांनी स्टॉलला भेट देऊन अमृतच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही अमृतच्या उपक्रमांचे अभिनंदन केले.

सिल्लोडमध्ये महाराजस्व अभियानात ‘अमृत’च्या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मुख्य फोटो
सिल्लोडमध्ये महाराजस्व अभियानात ‘अमृत’च्या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अतिरिक्त फोटो

सिल्लोडमध्ये महाराजस्व अभियानात ‘अमृत’च्या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

सिल्लोड, दि. ३० : स्वस्तिक लॉन्स, सिल्लोड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांच्या माहिती स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी नागरिकांना कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योजकता तसेच व्याज परतावा योजनांची सविस्तर माहिती दिली. अनेक लाभार्थ्यांनी स्टॉलला भेट देऊन विविध योजनांबाबत मार्गदर्शन घेतले.

या वेळी मा.आमदार अब्दुल सत्तार यांनी अमृतच्या स्टॉलला भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. तालुक्यातील लाभार्थ्यांना अमृतच्या व्याज परतावा योजनेचा प्रत्यक्ष फायदा होत असल्याचे सांगत त्यांनी पुढील सहकार्याचे आश्वासन दिले.

पावसाळी वातावरणातही नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविल्याबद्दल उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी आणि तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी योगेश रोडे यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमादरम्यान अमृत संस्थेच्या योगदानाबद्दल त्यांचा मंचावर विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सोयगावच्या तहसीलदार मीना जोगदंड, दोन्ही तालुक्यांचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, महसूल अधिकारी तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमात अमृतच्या योजनांविषयी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. सामान्य नागरिकांना रोजगार व उद्योजकतेची दिशा देणारे अमृतचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 31-07-2026 News publication date | Time: 11:04 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 31-07-2026 News publication date | Time: 11:04 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement