महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अमृत, जिल्हा कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने पराक्रम दिन तथा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती निमित्त जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या अधिकृत पोस्टरचे विमोचन माननीय निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अनिरुद्ध बक्षी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यवतमाळ, दि. ३१ जुलै : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अमृत, जिल्हा कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने पराक्रम दिन तथा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती निमित्त जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या अधिकृत पोस्टरचे विमोचन माननीय निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अनिरुद्ध बक्षी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अनिरुद्ध बक्षी यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे शौर्य, पराक्रम, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठा यांचा आदर्श आजच्या युवा पिढीसमोर पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहासाची प्रेरणा समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी स्पर्धांच्या माध्यमातून युवक-युवतींचा सहभाग वाढणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. अमृत जिल्हा कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये विविध वयोगटातील विद्यार्थी, युवक-युवती तसेच नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धांद्वारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्याचा, पराक्रमाचा आणि राष्ट्रसेवेच्या विचारांचा प्रसार करण्याचा उद्देश आहे. यावेळी अमृतच्या कार्याची तसेच सामाजिक, शैक्षणिक व कौशल्य विकासाच्या विविध उपक्रमांची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अनिरुद्ध बक्षी यांना देण्यात आली. त्यांनी अमृतच्या कार्याला शुभेच्छा देत अशा लोकहिताच्या उपक्रमांना प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी अमृत जिल्हा कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते. अमृत, जिल्हा कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, युवक-युवती व नागरिकांनी पराक्रम दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा जिल्हा व्यवस्थापक ९११२२२७६३३ जिल्हा कार्यालय पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए-१, अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment