अहिल्यानगर येथे "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात अमृत संस्थेच्या उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षण लाभार्थ्याना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त,अपर तहसील कार्यालय,अहिल्यानगर यांच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत आज रोजी "लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय",टिळक रोड, नगर येथे विशेष प्रशासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात "अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम" प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आमदार मा श्री.संग्राम जगताप, प्रांत अधिकारी मा श्री.सुधीर पाटील, अपर तहसीलदार मा. श्री.स्वप्नील ढवळे तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
तसेच अमृत संस्थेच्या योजना चा स्टॉल ही इथे उपलब्ध होता. .अमृत संस्थेच्या आगामी प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगाराच्या संधी व विविध योजनांची माहिती स्टॉल वर भेट देणाऱ्यास दिली गेली. स्टॉलला भेट देणाऱ्याचीं नोंदणी ही केली गेली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment