'पराक्रम दिन' निमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांच्या प्रसार व प्रसिद्धीसाठी मा. जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली यांना अधिकृत पत्र व प्रेस नोट सादर करण्यात आली. दि. १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणाऱ्या स्पर्धांची माहिती विद्यार्थी व नागरिकांपर्यंत व्यापकपणे पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्धी करण्याची विनंती करण्यात आली.
हिंगोली, : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'पराक्रम दिन' राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांच्या प्रसार व प्रसिद्धीसंदर्भात मा. जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली यांना अधिकृत पत्र व प्रेस नोट सादर करण्यात आली.
दि. १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धांची माहिती जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक संस्था व नागरिकांपर्यंत पोहोचावी, तसेच स्पर्धेत व्यापक सहभाग नोंदविला जावा, यासाठी स्थानिक प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे व डिजिटल माध्यमांद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
या उपक्रमास मा. जिल्हा माहिती अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याबद्दल अमृत, हिंगोलीच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment