खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था 'अमृत' यांच्या विविध योजनांचा लाभ राज्यातील विद्यार्थ्यांना होत आहे. याच अंतर्गत माजलगाव येथील पार्थ भूषण रुद्रवार हा विद्यार्थी सध्या आयआयआयटी कोटा (IIIT Kota) येथे शिक्षण घेत असून त्याला अमृत संस्थेअंतर्गत दरमहा १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.
बीड / वृत्तसेवा :
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) यांच्या विविध योजनांचा लाभ राज्यातील विद्यार्थ्यांना होत आहे. याच अंतर्गत माजलगाव येथील पार्थ भूषण रुद्रवार हा विद्यार्थी सध्या आयआयआयटी कोटा (IIIT Kota) येथे शिक्षण घेत असून त्याला अमृत संस्थेअंतर्गत दरमहा १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. या शिष्यवृत्तीपैकी पहिल्या टप्प्यातील ६० हजार रुपयांची रक्कम थेट त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या आर्थिक सहाय्याबद्दल पार्थने महाराष्ट्र शासन व अमृत प्रबोधिनीचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. आर्थिक आधारामुळे शिक्षणाला मिळाले बळ शिष्यवृत्तीबाबत प्रतिक्रिया देताना पार्थ रुद्रवार म्हणाला, "उच्च शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना शासनाच्या या योजनेमुळे माझ्या कुटुंबावरील आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. दरमहा मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमुळे शैक्षणिक खर्च भागविणे सुलभ झाले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यातील ६० हजार रुपयांची रक्कम वेळेत खात्यात जमा झाल्याने मोठा दिलासा मिळाला." सोप्या आणि पारदर्शक प्रक्रियेचे कौतुक पार्थने पुढे सांगितले की, "अर्ज भरण्यापासून कागदपत्र पडताळणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक होती. प्रक्रियेदरम्यान अमृत संस्थेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. कोणतीही अडचण आल्यास तत्काळ सहकार्य मिळाले. खुल्या प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे." नामांकित संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना अमृत संस्थेच्या वतीने देशातील नामांकित शैक्षणिक संस्था जसे की एम्स (AIIMS), आयआयटी (IIT), ट्रिपल आयटी (IIIT) आणि आयआयएम (IIM) यामध्ये प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना दरमहा १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. या योजनेमुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468
पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय, अथर्व अभ्यासिकेच्या वर, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी
बीड. 431122
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ "यावर्षी एम्स, आयआयटी, आयआयएम आणि ट्रिपल आयटीसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अमृत संस्थेकडे शिष्यवृत्तीसाठी त्वरित अर्ज करावेत," असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी व उपव्यवस्थापक दिगंबर जोशी यांनी केले आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे पार्थ रुद्रवारसारख्या अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळत असून, गुणवंत विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment