छत्रपती संभाजीनगर येथील शारदा मंदिर कन्या प्रशाला येथे अमृत संस्थेच्या वतीने १८ ऑगस्ट 'पराक्रम दिन' (थोरले बाजीराव पेशवे जयंती) निमित्त आयोजित उपक्रमांची माहिती देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या १८ ऑगस्ट 'पराक्रम दिन' (थोरले बाजीराव पेशवे जयंती) निमित्त विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी शारदा मंदिर कन्या प्रशाला, छत्रपती संभाजीनगर येथे भेट देण्यात आली. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका अनुराधा पांडे यांची भेट घेऊन अमृतच्या विविध योजना तसेच 'पराक्रम दिन' निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी निबंध, वक्तृत्व, रिल्स स्पर्धा आणि इतर उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment