सरस्वती बाल संस्कार केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

लातूर येथे अमृत वर्गाच्या नियोजनासाठी सरस्वती विद्यालय, लातूर येथे भेट देण्यात आली. यावेळी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरु पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सरस्वती बाल संस्कार केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी मुख्य फोटो
सरस्वती बाल संस्कार केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी अतिरिक्त फोटो

लातूर : अमृत वर्गाच्या नियोजनासाठी सरस्वती विद्यालय, लातूर येथे भेट देण्यात आली. यावेळी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरु पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त अमृत वर्गाचे मार्गदर्शक अमृतचे उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी व अमृत मित्र श्री. अमित पांडे यांचे गुरु पूजन करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या संस्थाचालिका सौ. शिवानी ताथोडे तसेच ईतर शिक्षक वृंद उपस्थित होते. उपस्थितांनी गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करत भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. ज्ञान, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी गुरुंचे योगदान अनमोल असून, त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडते तसेच व्यक्तिमत्त्व विकासाला योग्य दिशा मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी अमृत वर्गाच्या आगामी नियोजनासह विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सर्व गुरुजनांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अधिक महितीसाठी संपर्क : पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512

फोन नंबर- ७३९१०६५४७०

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: कमलाक्षी कुलकर्णी News publisher name | Date: 30-07-2026 News publication date | Time: 02:06 PM News publication time | Views: 54 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: कमलाक्षी कुलकर्णी News publisher name | Date: 30-07-2026 News publication date | Time: 02:06 PM News publication time | Views: 54 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement