अमृत संस्थेच्या वतीने दि. ४ व ५ ऑगस्ट २०२६ रोजी अमृतपेठ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम स्वामी समर्थ हॉल, रामनगर, मुख्य बसस्थानकाच्या मागे, ग्रामीण रुग्णालयाजवळ, मेहकर येथे सकाळी १०.०० ते रात्री ९.०० या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठेचे मेहकर येथे ४ व ५ ऑगस्ट रोजी आयोजन
बुलढाणा : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर अमृत मित्र व अमृत सखी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ व ५ ऑगस्ट २०२६ रोजी अमृतपेठ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम स्वामी समर्थ हॉल, रामनगर, मुख्य बसस्थानकाच्या मागे, ग्रामीण रुग्णालयाजवळ, मेहकर येथे सकाळी १०.०० ते रात्री ९.०० या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
अमृतपेठ ही स्थानिक उद्योजक, महिला बचत गट, स्टार्टअप, कारागीर आणि स्वदेशी उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणारे प्रभावी व्यासपीठ आहे. ग्राहकांना एकाच ठिकाणी दर्जेदार, स्वदेशी व नाविन्यपूर्ण उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळणार असून उद्योजकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन, विक्री आणि विपणनासाठी उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमात ग्राहकांना थेट उत्पादकांकडून खरेदी, स्थानिक व स्वदेशी उत्पादनांचा खजिना, नवीन स्टार्टअप व अनोख्या वस्तूंचा अनुभव, तसेच ग्राहक आणि उद्योजकांचा थेट संवाद अनुभवता येणार आहे. प्रत्येक स्टॉलवर गुणवत्ता, विश्वास आणि वेगळेपण यांना प्राधान्य देण्यात आले असून दर एक तासाला आकर्षक लकी ड्रॉ देखील आयोजित करण्यात येणार आहे.
मेहकर व परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाला मोठ्या संख्येने भेट देऊन स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे तसेच स्थानिक उद्योजकांना बळ द्यावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री जिग्नेश कमानी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी-
अमृत जिल्हा कार्यालय , ३०५ तिसरा मजला , बुलढाणा प्राईड बिल्डिंग, बुलढाणा येथे संपर्क करावा.
फोन नंबर - 9112227637/8308998922
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment