नागपूर येथे अमृत संवाद सेतू उपक्रमासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी यांची अमृत प्रतिनिधींनी घेतली भेट

'अमृत संवाद सेतू' या अमृत संस्थेच्या अभिनव उपक्रमाच्या नियोजनासंदर्भात नागपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांची अमृतच्या प्रतिनिधींनी नुकतीच भेट घेतली.

नागपूर येथे अमृत संवाद सेतू उपक्रमासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी यांची अमृत प्रतिनिधींनी घेतली भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'अमृत संवाद सेतू' या उपक्रमाच्या नियोजनासंदर्भात नागपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांची अमृतच्या प्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

'अमृत संवाद सेतू' या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना प्रशासनाची कार्यपद्धती समजावी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळावी आणि प्रशासनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठीच हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार असून प्रशासनाशी संवादाचे प्रभावी व्यासपीठ त्यांना उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांना प्रशासनाशी मैत्रीपूर्ण संवाद साधण्याची आणि शासनव्यवस्थेची प्रत्यक्ष माहिती जाणून घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७७३


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Aaditya Avadhut Kulkarni News publisher name | Date: 30-07-2026 News publication date | Time: 10:28 AM News publication time | Views: 40 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news
Publisher: Aaditya Avadhut Kulkarni News publisher name | Date: 30-07-2026 News publication date | Time: 10:28 AM News publication time | Views: 40 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement