नांदेडमध्ये अमृत संस्थेने घेतलेल्या निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग
परभणी : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने नांदेडमध्ये पाच ते २२ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या अमृत सूर्यमित्र या निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमात परभणीतील पाच जण सहभागी झाले होते. प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करतानाच त्यांनी आपल्याला त्यातून उद्योग सुरू करण्याचा आत्मविश्वास मिळाल्याचे आवर्जून नमूद केले.
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींच्या हाताला काम मिळावे, बेरोजगारी दूर व्हावी आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम
व्हावेत यासाठी राज्य शासनाची अमृत ही स्वायत्त संस्था सदैव प्रयत्नशील असते. त्या उपक्रमांतर्गत नांदेडमध्ये पाच डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. परभणीतील सूर्यकांत देवस्थळे, संजय कौंडिण्य, सुमित मिश्रा, सुहास डंख आणि श्रीपाद कुलकर्णी हे पाच जण त्यात सहभागी झाले होते. त्यात त्यांना सोलार पॅनेल देखभाल व दुरुस्तीचे तांत्रिक आणि सखोल प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणादम्यान संस्थेच्या वतीने या लाभार्थ्यांची नाश्ता, निवास व भोजनव्यवस्थाही करण्यात आली होती.
शासनाला वीजनिर्मितीसाठी उद्भवत असलेल्या अडचणी, जनतेला भरावे लागत असलेले वाढते वीजबिल यावर उत्तम उपाय म्हणून आज सौर यंत्रणेकडे पाहिले जाते. घरावरील सौर पॅनेल्सना आज अतिशय मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे त्याचे इन्स्टॉलेशन आणि देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या मनुष्यबळाची आज गरज आहे. या व्यावसायिक क्षेत्रामध्ये वाढती स्पर्धा लक्षात घेता तरुणांनी अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण घेऊन व्यवसायात उतरून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावे, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत जिल्हा कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत,
पहिला मजला, बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला,
परभणी.
मोबाइल : 7391065473
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment