नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातील अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला शासकीय कार्याप्रणालीची माहिती-
तळोदा येथील प्रशासकीय कार्यलयात अमृत सवांद सेतू कार्यक्रम घेण्यात आला
तहसीलदार दीपक डिवरे यांनी तहसील कार्यालयातील विविध विभागांबद्दल सविस्तर माहिती दिली.
त्यात पुरवठा विभाग, महसूल विभाग, मतदान विभाग, कोषागार विभाग,नोंदणी व मुद्रांक विभाग असे सर्वच विभागातील विभाग अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले . कागदपत्रे कशी तयार करायची? कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते? कोणत्या कामासाठी कोणत्या विभागात संपर्क करायचा?कोणत्याही योजनेसाठी वयाची अट काय असते? विविध योजनांचे लाभ कसे मिळतात? कोणाला मिळतात ? इतकेच नाही तर , गुगल जेमिनीसारख्या ए.आयची आपण कशाप्रकारे मदत घेऊ शकतो? याबद्दलही माहिती दिली.
याच प्रशासकीय कार्यालयात शहर पोलीस स्टेशन सुद्धा होते. तेथील पोलीस निरीक्षक -श्री. राजन मोरे साहेब, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नाली सोनावणे मॅडम यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी गावे , महत्वाची भारतीय दंडसंहिता कलमे , पोलिस स्टेशनमधील कर्मचारी, त्यांचे कार्य , आपतकालीन सेवा" १००, पोलीस नियंत्रण कक्ष, १०९१-महिला हेल्पलाईन, १०९८- चाईल्ड हेल्पलाईन, ११२- राष्ट्रीय आपतकालीन सहाय्य
यावर कसा संपर्सिक करायचा?याची माहिती दिली. यावेळी विद्यार्थांनी पहिल्यांदाच पोलीस कोठडी (जेल )पाहिली.
श्री. राजन मोरे म्हणाली की, " कुठेही अपराध होत असेल ,तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर तुम्ही आम्हाला माहिती द्या, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. पोलीस हें आपले मित्र असतात, म्हणून आपल्यातला भ्रम दूर करा ".
तहसीलदार साहेबांनी त्यांचा दालनात 25 -25 विद्यार्थ्यांचे गट बोलावून विद्यार्थी, विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती दिली या उपक्रमाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन संदर्भात अचूक माहिती झाली. भविष्यात ते नक्कीच त्यांच्या उपयोगास येईल.अशी आशा अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी व्यक्त केली.
या वेळी तळोदा येथील अद्यापक शिक्षण मंडळातील सिनियर व जुनिअर महाविद्यालयातील जवळ पास ९० ते १०० विद्यार्थी उपस्थित होते प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे आणि आभार प्राध्यापक मगरे सर यांनी केले.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४६९
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment