पुणे जिल्ह्यातील उरळगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे अमृत वर्ग संपन्न

पुणे जिल्ह्यातील स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,उरळगाव येथे विद्यार्थ्यांसाठी 'अमृत वर्ग' अत्यंत उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात पार पडला.

पुणे जिल्ह्यातील  उरळगाव येथे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे अमृत वर्ग संपन्न मुख्य फोटो
मुख्य फोटो

उरळगाव होलगुंडे वस्ती येथे स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उरळगाव येथे आज विद्यार्थ्यांसाठी 'अमृत वर्ग' अत्यंत उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा, या उद्देशाने या विशेष वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

या अमृत वर्गादरम्यान विद्यार्थ्यांकडून शारीरिक खेळांसोबतच त्यांची विचारक्षमता वाढवणारे विविध बौद्धिक खेळ खेळवून घेण्यात आले. तसेच मुलांकडून सोपे व्यायाम आणि योगासने करून घेण्यात आली. आरोग्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजवण्यासाठी सर्वांनी मिळून देशभक्तीपर गीते म्हटली. यामुळे संपूर्ण शाळा परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला होता.

या विशेष उपक्रमाप्रसंगी अमृत मित्र कमलाकर कुलकर्णी आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री गांधिले गुरुजी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्य, वाचन आणि दैनंदिन व्यायामाचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री गांधिले गुरुजी गुरुजी हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या अशा अमृत वर्गांसाठी नेहमीच मोलाचे सहकार्य आणि प्रोत्साहन देतात, या वर्गात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने सहभाग घेतला.

अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७६७


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 06:26 PM News publication time | Views: 38 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news
Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 06:26 PM News publication time | Views: 38 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement