अहिल्यानगर मधील बुऱ्हाणनगर - बाणेश्वर महाविद्यालयात 'अमृत पराक्रम दिन' आयोजनाची माहिती

अहिल्यानगर मधील बुऱ्हाणनगर येथील बाणेश्वर महाविद्यालय येथील प्राचार्य शिकारे सी. डी. यांना 'अमृत पराक्रम दिन'(श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - अपराजित योद्धा )वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रील स्पर्धा आयोजित करण्याबाबत पत्र देण्यात आले.

अहिल्यानगर मधील बुऱ्हाणनगर - बाणेश्वर महाविद्यालयात 'अमृत पराक्रम दिन' आयोजनाची  माहिती  मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर मधील बुऱ्हाणनगर येथील बाणेश्वर महाविद्यालय येथील प्राचार्य शिकारे सी. डी.सर यांना 'अमृत पराक्रम दिन'(श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - अपराजित योद्धा )वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रील स्पर्धा आयोजित करण्याबाबत पत्र देण्यात आले.

दरवर्षी दि. 18 ऑगस्ट रोजी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती साजरी करण्यात येते. चालू वर्षापासून महाराष्ट्र राज्य स्तरावर अमृत संस्थेतर्फे दि. १८ ऑगस्ट हा दिवस 'अमृत पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्याचा गौरव करणे तसेच त्यांच्या पराक्रम, नेतृत्व व राष्ट्रनिष्ठा यांची माहिती जनतेपर्यंत, विशेषतः नवीन पिढीतील युवकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्याअनुषंगाने राज्यभर दि. १ ऑगस्ट २०२६ ते दि. १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध स्पर्धा, व्याख्याने इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. नर्मदे पलीकडे जाऊन उत्तर दिग्विजय करणारा वीर म्हणून श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. दक्षिणेतील श्रीरंगपट्टण पासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत बाजीरावांनी मराठ्यांच्या अधिपत्त्याखाली आणला. अशा या महापराक्रमी योद्ध्याचा १८ ऑगस्ट २०२६ हा जयंती दिन आहे. त्यांच्या शौर्याचा आणि दिग्विजयाचा परिचय सर्व सामान्यांना व्हावा आणि या महान योद्ध्याचे स्मरण राहण्यासाठी अमृत संस्थेतर्फे पराक्रम दिन साजरा करण्यात येणार आहे. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 05:07 PM News publication time | Views: 97 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 05:07 PM News publication time | Views: 97 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement