गडहिंग्लज तहसील कार्यालयात ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम; जागृती हायस्कूलच्या ५० विद्यार्थ्यांचा तहसीलदारांशी थेट संवाद

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) जिल्हा कार्यालय ,कोल्हापूर यांच्या पुढाकारातून गडहिंग्लज तहसील कार्यालयात ‘अमृत संवाद सेतू’ या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात जागृती हायस्कूल, गडहिंग्लज येथील ५० विद्यार्थ्यांनी व त्यांचे शिक्षक यांनी सहभाग घेतला.

गडहिंग्लज तहसील कार्यालयात ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम; जागृती हायस्कूलच्या ५० विद्यार्थ्यांचा तहसीलदारांशी थेट संवाद मुख्य फोटो
गडहिंग्लज तहसील कार्यालयात ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम; जागृती हायस्कूलच्या ५० विद्यार्थ्यांचा तहसीलदारांशी थेट संवाद अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) जिल्हा कार्यालय ,कोल्हापूर यांच्या पुढाकारातून गडहिंग्लज तहसील कार्यालयात ‘अमृत संवाद सेतू’ या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात जागृती हायस्कूल, गडहिंग्लज येथील ५० विद्यार्थ्यांनी व त्यांचे शिक्षक यांनी सहभाग घेतला.

यावेळी तहसीलदार मा. ऋषिकेश शेलके यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत तहसील कार्यालयाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली. महसूल प्रशासनाची रचना, विविध शासकीय विभागांचे कार्य, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मार्गदर्शन केले.

तहसील कार्यालयाच्या अखत्यारीतील विविध शाखा, त्यांची जबाबदारी आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शासकीय यंत्रणेविषयी विश्वास आणि जागरूकता वाढली. भविष्यात शासकीय कामकाज करताना ही माहिती निश्चितच उपयोगी ठरेल, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांसोबत उपस्थित शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणे ही अत्यंत उपयुक्त बाब असल्याचे सांगितले. अशा प्रकारचे मार्गदर्शनपर आणि जनजागृती करणारे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

‘अमृत संवाद सेतू’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रशासन अधिक जवळून समजले असून, जबाबदार आणि जागरूक नागरिक घडविण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व त्यांच्या शिक्षकांनी अमृत जिल्हा व्यवस्थापक श्री. अभिजीत कुलकर्णी व अमृत मित्र श्री. शिरीष कुलकर्णी यांचे मनापासून आभार मानले . अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 04:55 PM News publication time | Views: 63 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 04:55 PM News publication time | Views: 63 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement