नांदेड येथे अमृतच्या वतीने १० दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमासाठी प्रवेश नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
नांदेड, दि. २९ जुलै : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था *महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)* यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या १० दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमासाठी प्रवेश नोंदणीला प्रारंभ झाला असून इच्छुक लाभार्थ्यांना त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वयंरोजगाराला चालना देणे आणि नवउद्योजक घडविणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. या प्रशिक्षणामध्ये ६ दिवस ऑनलाइन Recorded Video Classes तसेच ४ दिवस अमृत कार्यालय, अष्टविनायक नगर, कॅनल रोड, नांदेड येथे प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, प्रकल्प अहवाल (Project Report) तयार करणे, विविध शासकीय योजना, बँक कर्ज मार्गदर्शन, डिजिटल मार्केटिंग, GST व UDYAM नोंदणी, तसेच व्यवसाय व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. अमृतच्या लक्षित गटातील युवक-युवती, महिला, बचत गट सदस्य, इच्छुक उद्योजक व लाभार्थी यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुकांनी आपल्या जिल्हा अमृत कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन किंवा ७३९१०६५४७२ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून प्रवेश नोंदणी करावी. प्रशिक्षणासाठी प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : 📞 *७३९१०६५४७२ अमृत कार्यालय, अष्टविनायक नगर, कॅनल रोड, नांदेड
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment