गडचिरोली मध्ये होणार 'अमृत संवाद सेतू' उपक्रम!

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत द्वारे अमृत संवाद सेतू हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत तहसील कार्यालयात व इतर विविध शासकीय कार्यालयांमध्ये शैक्षणिक भेटी आयोजित करण्यात येणार आहे.

गडचिरोली मध्ये होणार 'अमृत संवाद सेतू' उपक्रम! मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमृततर्फे अमृत संवाद सेतू हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाच्या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय तसेच विविध शासकीय कार्यालयांची रचना, कामकाजाची पद्धत , प्रशासकीय प्रक्रिया ,शासनाच्या विविध योजना, शासकीय अधिकारी यांच्याशी संवाद, इत्यादी टप्पे आयोजित आहेत.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शासकीय कामकाजाबद्दल माहिती मिळावी आणि त्यांच्या मनात असलेली शासकीय बाबीं बद्दलची भीती , गैरसमज दूर करणे हा आहे.

गडचिरोली मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुक्रवार दिनांक ३१ जुलै ला तहसील कार्यालय गडचिरोली तसेच इतर शासकीय कार्यालयांमध्ये शैक्षणिक भेट करण्यात येणार आहे. या उपक्रमाला माननीय तहसीलदार (गडचिरोली) यांनी आपला प्रतिसाद दर्शविला .

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

Publisher: वेदांत सुनील मेहता News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 04:44 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: Gadchiroli Related district of the news
Publisher: वेदांत सुनील मेहता News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 04:44 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: Gadchiroli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement