'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - पराक्रम दिन-स्पर्धांसाठी शिक्षण विभागाचा सकारात्मक प्रतिसाद

अमृतच्या वतीने आयोजित "श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पराक्रम दिन – २०२६" निमित्त राज्यस्तरीय विविध स्पर्धांच्या जनजागृतीसाठी आज जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील माननीय शिक्षणाधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.

'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - पराक्रम दिन-स्पर्धांसाठी शिक्षण विभागाचा सकारात्मक प्रतिसाद मुख्य फोटो
मुख्य फोटो

यावेळी अमृतच्या वतीने राज्यभर आयोजित करण्यात येत असलेल्या निबंध, वक्तृत्व, रील निर्मिती, नाट्य साहित्य लेखन आणि काव्य लेखन या स्पर्धांची माहिती देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळांपर्यंत स्पर्धेची माहिती अधिकृतपणे पोहोचवून विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतील, यासाठी शिक्षण विभागामार्फत आवश्यक पत्रव्यवहार करण्याची नम्र विनंती करण्यात आली.

माननीय शिक्षणाधिकारी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये इतिहास, राष्ट्रभक्ती, नेतृत्वगुण आणि सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या अशा उपक्रमांना शिक्षण विभागाचे पूर्ण सहकार्य राहील, असा सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असा मानसही त्यांनी व्यक्त केला.

अमृतच्या या उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी अमृत जिल्हा व्यवस्थापक विक्रममोहन पांडे व अमृत मित्र श्रीरंग खोंड उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 03:58 PM News publication time | Views: 52 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news
Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 03:58 PM News publication time | Views: 52 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement