'अमृत संवाद सेतू' उपक्रमाला बल्लारपूर तहसील प्रशासनाची सकारात्मक साथ

अमृत, चंद्रपूर यांच्या वतीने बुधवारी (दि. २९ जुलै) मा. तहसीलदार, बल्लारपूर यांची सदिच्छा भेट घेऊन "अमृत संवाद सेतू" या अभिनव उपक्रमाची सविस्तर माहिती सादर करण्यात आली.

'अमृत संवाद सेतू' उपक्रमाला बल्लारपूर तहसील प्रशासनाची सकारात्मक साथ मुख्य फोटो
मुख्य फोटो

यावेळी उपक्रमाचा उद्देश, विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांना तहसील कार्यालयाची कार्यपद्धती, महसूल विभागाकडून दिल्या जाणाऱ्या विविध सेवा, शासकीय योजना तसेच नागरिकांच्या हक्कांबाबत प्रत्यक्ष कार्यालयीन भेटीद्वारे मार्गदर्शन करण्याच्या संकल्पनेची माहिती देण्यात आली. उपक्रमाची माहिती ऐकल्यानंतर मा. तहसीलदार साहेबांनी उपक्रमाचे स्वागत करत तत्त्वतः परवानगी व आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. तसेच दि. १ ऑगस्ट (शनिवार) रोजी बल्लारपूर तहसील कार्यालयात "अमृत संवाद सेतू" उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी तहसील प्रशासनामार्फत आवश्यक समन्वय व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी, युवक व नागरिकांना तहसील कार्यालयातील विविध शाखांची कार्यपद्धती, महसूल विभागाच्या सेवा, दाखले, प्रमाणपत्रे, शासकीय योजना तसेच नागरिकांना उपलब्ध सुविधांची प्रत्यक्ष माहिती देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होण्यासोबतच शासनाच्या सेवांबाबत जनजागृतीही प्रभावीपणे होणार आहे. 'अमृत संवाद सेतू' हा उपक्रम प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ, पारदर्शक व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, बल्लारपूर येथील उपक्रमाला तहसील प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे या अभिनव संकल्पनेच्या यशस्वी अंमलबजावणीला मोठी चालना मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 03:42 PM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news
Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 03:42 PM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement