जागतिक मैत्री दिनानिमित्त अमृत पर्यटन अंतर्गत भंडारदरा येथे एकदिवसीय निसर्गभ्रमंतीचे आयोजन

जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधून अमृत पर्यटनतर्फे भंडारदरा येथे एकदिवसीय निसर्गभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे.

जागतिक मैत्री दिनानिमित्त अमृत पर्यटन  अंतर्गत भंडारदरा येथे एकदिवसीय निसर्गभ्रमंतीचे आयोजन मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत पर्यटन अंतर्गत दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी मैत्री दिनानिमित्त भंडारदरा येथे एकदिवसीय निसर्गभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गप्रेमी, मित्रपरिवार तसेच कुटुंबियांसाठी ही सहल एक संस्मरणीय अनुभव ठरणार असून, "निसर्गाचा आनंद... मैत्रीची साथ..." या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या निसर्गभ्रमंतीमध्ये सहभागी पर्यटकांना भंडारदरा परिसरातील रमणीय स्थळांना भेट देता येणार आहे. यामध्ये रंधा वॉटरफॉल, वसुंधरा वॉटरफॉल , बाहुबली वॉटरफॉल, नेकलेस वॉटरफॉल, अमृतेश्वर महादेव मंदिर, सांदण दरी, कोकण कडा आणि रिव्हर्स वॉटर फॉल या प्रमुख पर्यटनस्थळांचा समावेश आहे. सहलीसाठी प्रति व्यक्ती ₹२४०० इतके शुल्क निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये सकाळचा चहा, नाश्ता आणि स्वादिष्ट जेवण यांचा समावेश आहे. मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ९४०४५९३७२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/





Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 03:18 PM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 03:18 PM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement