गोंदिया येथे ३१ जुलै रोजी अमृत वर्ग प्रशिक्षकांच्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) यांच्या वतीने शुक्रवार, ३१ जुलै रोजी बिरसी विमानतळ मैदान, गोंदिया येथे अमृत वर्ग प्रशिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

गोंदिया येथे ३१ जुलै रोजी अमृत वर्ग प्रशिक्षकांच्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन  मुख्य फोटो
मुख्य फोटो

प्रशिक्षणातून परिवर्तन, परिवर्तनातून राष्ट्रनिर्माण; अमृत वर्ग प्रशिक्षकांचे एकदिवसीय शिबिर ३१ जुलैला गोंदियात गोंदिया,अमृतच्या वतीने शुक्रवार, दि. ३१ जुलै रोजी बिरसी विमानतळ मैदान, बिरसी (ता. व जि. गोंदिया) येथे अमृत वर्ग प्रशिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये अमृत वर्गाची संकल्पना, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, प्रभावी संवादकौशल्य, मूल्याधिष्ठित शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अध्यापन पद्धती तसेच प्रशिक्षकांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक कौशल्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षकांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल घडवून त्यांना अधिक सक्षम, प्रभावी आणि प्रेरणादायी बनविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. या शिबिराचे प्रमुख प्रशिक्षक अमृत मित्र श्री. प्रणय नागले हे विविध प्रेरणादायी व प्रात्यक्षिक सत्रांद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून प्रशिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक विचार, शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी विकसित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त होतील. विशेष म्हणजे, गोंदिया तालुक्यातील युवक-युवती तसेच BSW (Bachelor of Social Work) आणि MSW (Master of Social Work) शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. समाजकार्याची आवड असलेल्या युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन अमृत वर्ग प्रशिक्षक म्हणून कार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अमृत वर्ग हा विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, नैतिक आणि सामाजिक विकासासाठी राबविण्यात येणारा उपक्रम असून, सक्षम, सुसंस्कारित, जबाबदार व राष्ट्रभिमानी नागरिक घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम प्रभावी भूमिका बजावत आहे. या प्रशिक्षण शिबिरात गोंदिया तालुक्यातील अधिकाधिक युवक-युवती तसेच BSW व MSW चे विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतचे गोंदिया जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७७६

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 01:24 PM News publication time | Views: 95 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news
Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 01:24 PM News publication time | Views: 95 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement