'अमृत संवाद सेतू' उपक्रमासाठी सुबोध हायस्कूलचे प्राचार्य संजय चौबे सर यांना निवेदन

अमृत संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'अमृत संवाद सेतू ' या अभिनव उपक्रमासाठी सुबोध हायस्कूल, अचलपूर येथील प्राचार्य संजय चौबे सर यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अमृत अमरावती जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक श्री. ऋषिकेश कथलकर यांनी प्राचार्य संजय चौबे सर यांची भेट घेऊन उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

'अमृत संवाद  सेतू' उपक्रमासाठी सुबोध हायस्कूलचे प्राचार्य संजय चौबे सर यांना निवेदन मुख्य फोटो
'अमृत संवाद  सेतू' उपक्रमासाठी सुबोध हायस्कूलचे प्राचार्य संजय चौबे सर यांना निवेदन अतिरिक्त फोटो

'अमृत संवाद सेतू ' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय तसेच इतर विविध शासकीय कार्यालयांना शैक्षणिक भेटी आयोजित करण्यात येणार आहेत. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांची रचना, कामकाजाची पद्धत, विविध विभागांचे कार्य, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, प्रशासकीय प्रक्रिया तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रत्यक्ष माहिती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या मनातील शासकीय कार्यालयांबाबतची भीती, संकोच व गैरसमज दूर करणे हा आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या मनात सरकारी कार्यालयांविषयी अनावश्यक भीती असते. प्रत्यक्ष कार्यालयांना भेट देऊन तेथील वातावरण, कामकाज आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद अनुभवल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, शासन व्यवस्थेबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होईल आणि भविष्यात ते कोणत्याही शासकीय कार्यालयात निर्भयपणे व आत्मविश्वासाने आपली कामे करू शकतील. प्राचार्य संजय चौबे सर यांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त केले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Rushikesh Harish kathalkar News publisher name | Date: 28-07-2026 News publication date | Time: 06:58 PM News publication time | Views: 58 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: Rushikesh Harish kathalkar News publisher name | Date: 28-07-2026 News publication date | Time: 06:58 PM News publication time | Views: 58 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement