'अमृत संवाद सेतू' उपक्रमांतर्गत एडेड हायस्कूल, बुलढाणा येथे सदिच्छा भेट

महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'अमृत संवाद सेतू' या उपक्रमांतर्गत एडेड हायस्कूल, बुलढाणा येथे सदिच्छा भेट देण्यात आली.

'अमृत संवाद सेतू' उपक्रमांतर्गत एडेड हायस्कूल, बुलढाणा येथे सदिच्छा भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

'अमृत संवाद सेतू' उपक्रमांतर्गत एडेड हायस्कूल, बुलढाणा येथे सदिच्छा भेट बुलढाणा : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था अमृत (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training – AMRUT) यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'अमृत संवाद सेतू' या उपक्रमांतर्गत एडेड हायस्कूल, बुलढाणा येथे सदिच्छा भेट देण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. किंबहुने यांची भेट घेऊन अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगार, उद्योजकता विकास, शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तसेच युवक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. 'अमृत संवाद सेतू' या उपक्रमाचा मुख्य उद्देश शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये व समाजातील विविध घटक यांच्याशी प्रभावी समन्वय प्रस्थापित करून शासनाच्या योजना, प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आहे, असे यावेळी सांगण्यात आले. या चर्चेदरम्यान प्राचार्य श्री. किंबहुने यांनी अमृत संस्थेच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये शाळेमार्फत आवश्यक ते सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली. तसेच भविष्यात अमृतच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम, मार्गदर्शन शिबिरे व जनजागृती उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी शाळेचे पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. या सदिच्छा भेटीमुळे अमृत संस्था आणि एडेड हायस्कूल, बुलढाणा यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ मिळवून देण्यासाठी निश्चितच सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय, बुलढाणा 305, तिसरा मजला, बुलढाणा प्राईड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा 📞 9112227637 / 8308998922


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 28-07-2026 News publication date | Time: 05:41 PM News publication time | Views: 46 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 28-07-2026 News publication date | Time: 05:41 PM News publication time | Views: 46 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement